नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरूवात झाली आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी या सुनावणीत अजित पवार गटाने मृत्यमुखी पडलेल्या लोकांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याचा दावा करत अजित पवार गटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची अश:रक्ष चिरफाड केली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार, दिवाळीचा दौराही केला जाहीर
निवडणुक आयोगाच्या सुनावणीत अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने दाखल केलेल्या २० हजार प्रतिज्ञापत्राची चिरफाड केली आहे. कारण ही प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचं निवडणुक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं. जे खोट्याच्या आधारावर वागतात ते शेवटी खोटचं करतात हे सिद्ध झालं आहे. निवडणूक आयोग काय निकाल देईल याच्याशी फार काही मला समजून घ्यायची इच्छा नाही. पण पुराव्यानिशी हे सिद्ध करण्यात आलं की हे सर्व खोटं होतं. जे म्हणत आलो आहे तेच अधर्माविरूद्ध धर्माची लढाई असं म्हणत आव्हाडांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस
दरम्यान, राष्ट्रवादीच्या निवडणुक चिन्हाच्या लढाईत आता झोमॅटोची ची एन्ट्री झाली आहे. अजित पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलेल्या २० हजार शपथपत्रांचीच तपासणी केली गेली. यामध्ये ८९०० शपथपत्र बोगस सापडले असून अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस शपथपत्रांची विभागणी केली आहे. २४ गटात विभागणी केलेल्या काही शपथपत्रे ही मृतांच्या नावे, काही अल्पवयीन मुलांच्या नावे, काही अस्तित्वात नसलेली पदे तर काही ठिकाणी झोमॅटो सेल्स मॅनेजर म्हणून लिहिले असल्याचा युक्तिवाद आयोगात करण्यात आला आहे.
आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे अॅीफिडेव्हीट देण्यात आलं होतं. त्या अॅलफिडेव्हीटमध्ये जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनुसंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या अॅ्फिडेव्हिटचे 24 भाग बनवले आणि… pic.twitter.com/92twPNM7yq
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही? पोलिस महासंचालकांनी दिली मोठी माहिती
हेही वाचा…“तर अजित पवारांवर तात्कळ गुन्हा दाखल करा,” आयोगाच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाची मोठी मागणी
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईत झोमॅटो ची एन्ट्री”,पाहा आज काय काय घडलं ? पुढची सुनावणी कधी ?
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांना पुण्यात दाखवले काळे झेंडे, पोलिसांनी युवकांना घेतले ताब्यात
हेही वाचा…अजित पवार गटाने दाखल केलेल्या शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू, निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद