नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे, रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. यातच सुनावणीत आता एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे.
हेही वाचा…बागेश्वर धामच्या दरबारात नऊ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, कृष्णचा भजन गायल्याने मुलाचा जन्म, मॉं शेरावाली प्रसन्न
राष्ट्रवादीच्या निवडणुक चिन्हाच्या लढाईत आता झोमॅटोची ची एन्ट्री झाली आहे. अजित पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलेल्या २० हजार शपथपत्रांचीच तपासणी केली गेली. यामध्ये ८९०० शपथपत्र बोगस सापडले असून अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस शपथपत्रांची विभागणी केली आहे.
हेही वाचा…“सरकार काय भाड्याने चालवायला दिलं आहे का?” वंंचितचा राज्य सरकारवर हल्लाबोल
२४ गटात विभागणी केलेल्या काही शपथपत्रे ही मृतांच्या नावे, काही अल्पवयीन मुलांच्या नावे, काही अस्तित्वात नसलेली पदे तर काही ठिकाणी झोमॅटो सेल्स मॅनेजर म्हणून लिहिले असल्याचा युक्तिवाद आयोगात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी चिन्हाबद्दलची पुढची सुनावणी आता २० नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा…लोकसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? आव्हाडांनी सांगितली दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारातली बातमी
शरद पवार गटाकडून समोरच्या बाजूवर बोगस शपथपत्रांचा आरोप आत्तापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली. राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये चिन्ह न गोठवता थेट अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांना पुण्यात दाखवले काळे झेंडे, पोलिसांनी युवकांना घेतले ताब्यात
हेही वाचा…अजित पवार गटाने दाखल केलेल्या शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू, निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार, दिवाळीचा दौराही केला जाहीर
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस
हेही वाचा…राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी एकनाथ शिंदे सरसावले, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना