पुणे : राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल अशा अनेकांची नावे घेता येईल. यानंतर एनडीए मध्ये आणण्यासाठी अजित पवार गटांकडून खुपदा प्रयत्न करण्यात आले परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. यादरम्यान अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यातच आता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांना पुण्यात दाखवले काळे झेंडे, पोलिसांनी युवकांना घेतले ताब्यात
आज सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या भेटीसाठी मोतीबागेत गेले आहेत. दिवाळीच्या दरम्यान अनेक राजकीय मतभेद बाजूला ठेऊन नेते भेटीगाठी घेत असतात. परंतु सध्या राष्ट्रवादीतील परिस्थिती पाहता दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन शरद पवारांची भेट घेण्यावर आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा…अजित पवार गटाने दाखल केलेल्या शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू, निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद
दरम्यान, अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या ताब्यात असलेल्या अनेक ग्रामपंचायती शरद पवारांच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे याचीही चर्चा सुरू आहे. यातच दिलीप वळसे पाटील यांच्या कारकिर्दीची सुरूवातच शरद पवारांचा पीए म्हणून झाली आहे. त्यामुळे शरद पवारांचा अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून दिलीप वळसे पाटलांकडे पाहलं जातंय. त्यामुळे या भेटीला आता अनेक अर्थ निघतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंनी दिवाळीत केला डबल धमाका,” राज्य सरकारवर साधला निशाणा
हेही वाचा…“अधर्माविरूद्ध धर्माची लढाई”, राष्ट्रवादी निवडणुक आयोग सुनावणी प्रकरण
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही? पोलिस महासंचालकांनी दिली मोठी माहिती
हेही वाचा…“तर अजित पवारांवर तात्कळ गुन्हा दाखल करा,” आयोगाच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाची मोठी मागणी
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईत झोमॅटो ची एन्ट्री”,पाहा आज काय काय घडलं ? पुढची सुनावणी कधी ?