मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका प्रसंगाची तुलना शिंदेंच्या बंडाशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राहून सुटका करून घेतली होती. तशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून बाहेर पडून सुटका करून घेतली. यावरून राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यावर कडाडून टिका केली आहे. यातच आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टिका केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी
गेली काही महिने सातत्याने महापुरूषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करत महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा सपाटा भाजपने सुरू केला आहे. विशेषत कंबोज, राणा, सोमय्या, कोश्यारी, लोढा या अमराठी भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल अवमूल्यनात्मक वक्तव्य हा निव्वळ योगायोग नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेखाली सुरू असलेले हे पुर्वनियोजित षडयंत्र आहे. असा टोला सुषमा अंधारे यांनी हाणला आहे.
मोदींना रावण म्हटल्यावर अत्यंत तत्परतेने व्यक्त होणारे देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना मात्र अळीमिळी करून बसतात हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे. असा कडाडूून हल्लाबोल देखील सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.
गेली काही महिने सातत्याने महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करत महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा सपाटा भाजपा ने सुरू केला आहे. विशेषतः कंबोज, राणा, सोमय्या, कोश्यारी, लोढा या अमराठी भाजप नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अवमूल्यनात्मक वक्तव्य हा निव्वळ योगायोग नव्हे तर
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 30, 2022
Read also
- “मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागितली नाही तर…;” महाराजांच्या बंडाची तुलना शिंदेंच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी आक्रमक
- “निवडणुका लागू दे, जनता यांना योग्य जागा दाखवेल”; महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून पवारांचा भाजपला टोला
- स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारेच मंदिराची जमीन हडपाताहेत”; काॅंग्रेसने भाजपला डिवचलं
- भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ.! देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
- “शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार