पुणे : राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका प्रसंगाची तुलना शिंदेंच्या बंडाशी केल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांची चढाओढ सुरू झाली आहे का ? त्यामुळे ह्या वाचाळवीरांना आता आवरण्याची गरज पडली आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?
आज प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वाचाळवीरांना आवरा असे सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. असं म्हणत अजित पवारांनी मंगल प्रभात लोढा यांची कानउघडणी केली आहे.
“मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू
एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो. हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते. एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चुक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे. ? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे स्टेजवर असतानाचा त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, आपल्याला जबाबदारी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
“माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता, पण..,” जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का ? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही. अशा शब्दांता अजित पवार यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावर नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे. जनता यांना योग्य जागा दाखवेल. असा सुचक इशाराही त्यांनी दिला.
वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी भूमिका देखील या लोकांना कळत नाही. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/tGPzAZ9QGd
— NCP (@NCPspeaks) November 30, 2022
Read also
- स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारेच मंदिराची जमीन हडपाताहेत”; काॅंग्रेसने भाजपला डिवचलं
- भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ.! देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
- “शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी
- “ती टिप्पणी प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती”; उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण