मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर आता फडणवीसांनी ज्येष्ठ नेते आणि मंत्री, तसेच सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली.
या पार्श्वभूमीवर, आज या भेटीसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी, “जो तुम्हाला प्रश्न पडलेला आहे, तोच मलाही पडलाय, नेमकं चाललंय काय?,” असं म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच, “आपण सगळेच प्रत्येक गोष्टीचा राजकीय अर्थ काढू लागलो आहोत. फडणवीसजींनी सुप्रियाताईंशी बोलून शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्या, यांनतर ते आजारी असल्याने घरीच आराम करत आहेत. त्यामुळे, फडणवीसांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय घडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.
Read Also :
- कुकडी सल्लागार समितीच्या पदावरून घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा; सरपंच काकासाहेब धांडे यांची मागणी
- कृष्णा काठी सर्व उमेदवार झाले निश्चित; रयत आणि संस्थापक पॅनलचे मनोमिलन मात्र बारगळले
- ओबीसी आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे ढकलून ठाकरे सरकार आम्हाला मुर्ख समजतयं का?
- काल पवारांच्या निवासस्थानी, आज खडसेंच्या घरी; राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप?
- मराठा तरुणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला