मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून बैठकांचा सपाटा लावला आहे. अजित पवार वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेत असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारात देखील हस्तक्षेप करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू
साखर कारखानादारांच्या कर्जासंदर्भात अजित पवार यांनी काही निर्णय घेतले होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्याच्या कारखान्यांवरील बंधन हटवली आहेत. एनसीडीसीने मंजूर केलेले कर्ज मिळवण्यासाठी अजित पवारांनी जाटक अटी घातल्या होत्या. त्यावर ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधन घातली.. पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधन हटवल्याचे वृत्त आले आहे. यातून सरकारची नाचक्की झाली. सरकारमध्ये कोणत्याही विषयावर एक धोरण नाही. फक्त आपआपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी सरकारमधील तिन्ही पक्ष राबत आहेत. सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का असा सवाल वडेट्टीवारांनी केला आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्कातंत्र, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी, तर खडसेंच्या कन्यालाही लागली लॉटरी
दरम्यान, अजित पवार हस्तक्षेप करत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे अजित पवार यांनी कुठल्याही फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्यानंतर ती फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल. अंतिम सहीसाठी मुख्यमंत्रांकडे फाईल येईल. पण त्याआधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी लागेल. असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत .
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”
हेही वाचा…“56 इंचाची छाती असलेले पंतप्रधानांना चीन घाबरत नाही का?” वडेट्टीवारांचा मोदींना सवाल, चीनचा विषय तापला
हेही वाचा…“वडेट्टीवारांची काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत मोठी बैठक, राजकीय हालचाली सुरूय”
हेही वाचा…ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात मात्र..,” राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं