मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक माजी नगरसेवक पक्षांत्तर करतांना दिसत आहेत. अनेक शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या काॅंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली.
हेही वाचा…““मोदी सरकारची जनतेला मोठी भेट, सिलिंडर ‘इतक्या’ किमंतीने लवकरच स्वस्त होणार ‘ “
मुंबई महापालिकेवर प्रशासक असल्यामुले निधी वाटपामध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी दिला जात नाही, दिला तरी तो नाममात्र असतो. जो सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देईल. त्यालाच निधी मिलेल असा पायंडा पाडला जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच सरकारच्या एकाधिकारशाही आणि भेदभाव करत असल्याची भावनाही नगरसेवकांनी सांगितली असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन दाखवला आरसा”
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, कोणत्याही पक्षातील आमदार असो की नगरसेवक त्यांचा प्रभाग व मतदार संघातील लाखो लोकांचे ते प्रतिनिधित्व करत असतात, लोकशाही मार्गाने त्यांना जनतेने त्या परिसराचा विकास करण्यासाठी निवडून दिलेले असते. त्यामुळे सरकारने भेदभाव न करता लोकप्रतिनिधीला विकास कामांसाठी निधी देणे गरजेचे आहे, ही माझी भूमिका आहे.
हेही वाचा…अन् धरणग्रस्तांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या, मंत्रालयात एकच गोंधळ
दरम्यान, सरकार हे कुण्या एकापक्षाचे नसते तर ते सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात हे भान एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ठेवले पाहिजे. हे असेच सुरू राहिले तर या एकाधिकारशाही विरोधात सरकारला धारेवर धरून जाब विचारल्याशिवाय मागे हटणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
मुंबईतील काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक आज पार पडली. यावेळी नगरसेवकांनी सरकारच्या एकाधिकारशाही आणि भेदभाव करत असल्याची भावना मांडली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
मुंबई महापालिकेवर प्रशासक असल्यामुळे निधी वाटपामध्ये विरोधी… pic.twitter.com/S3SaAEMQx0
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात मात्र..,” राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्कातंत्र, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी, तर खडसेंच्या कन्यालाही लागली लॉटरी
हेही वाचा…“अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ही महत्वाची मागणी”