बीड : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पक्षात अनेक बदल केले आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पक्षात तरूणांना संधी दिली असून अजित पवार गटातील नेत्यांच्या विरोधात आता शरद पवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत राजकारण तापणार अशा चर्चा सुरूय.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे, संजय राऊतांना अटक करून कसून चौकशी करावी,” तुषार भोसलेंची मागणी
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या जागी आता विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी सोडून गेलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदानात अगदी आठवड्यापुर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले बबन गिते यांनाही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय.
हेही वाचा…सरकारचा हलगर्जीपणा..,! “केंद्राने निर्यात शुल्क लावले, बंदरात ८०० टन कांदे सडले!
दरम्यान, शरद पवारांची अलिकडेच बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बबन गिते यांनी ७०० गाड्या घेऊन शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यावर आता शरद पवारांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे परळीत आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार बबन गिते यांना उतरवण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ही महत्वाची मागणी”
हेही वाचा…““मोदी सरकारची जनतेला मोठी भेट, सिलिंडर ‘इतक्या’ किमंतीने लवकरच स्वस्त होणार ‘ “
हेही वाचा…“शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन दाखवला आरसा”
हेही वाचा…अन् धरणग्रस्तांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या, मंत्रालयात एकच गोंधळ
हेही वाचा…हेही वाचा…“आजचा पाठ म्हणजेच कानामागून आली आणि तिखट झाली”, काॅंग्रेसने चंद्रकांत पाटलांना डिवचलं