पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून इतर पक्षातील पालकमंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचं वजन असणाऱ्या भागात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून इतर पक्षातील पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यातच पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं आहे.
हेही वाचा…“सरकारमधीलच ‘हा’ आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत”
मे महिन्यातत झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतील डीपीडीसी ४०० कोटी रूपयांच्या विकासकामांना तीन महिन्यांनंतरही मंजूरी मिळालेली नाही. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याने या राजकारणात जिल्हा प्रशासनालाच मुख्यमंत्र्यांच्या रोषाला सामारे जावे लागल्याची चर्चा सुरू आहे. तसेच पुण्यात स्थानिक नेत्यांकडून पालकमंत्र्यांवर दबाव टाकल्याचा प्रयत्नही केला जात असल्याची चर्चा सुरूय.
हेही वाचा…दोन महिन्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, ११ दिवस राज्यात “शिवशक्ती जागर” यात्रा काढणार
दरम्यान, पुण्यातील या घटनेवर काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी खोचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, सध्या प्रात्यक्षिकांतून मराठी म्हणींचे प्रशिक्षण राज्य सरकार देत आहे. आजचा पाठ कानामागून आली आणि तिखट झाली. असं म्हणत सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना डिवचलं आहे.
सध्या प्रात्यक्षिकांतून मराठी म्हणींचे प्रशिक्षण राज्य सरकार देत आहे –
आजचा पाठ ( चंद्रकांत दादांच्या मनातील 😀)
“कानामागून आली आणि तिखट झाली” pic.twitter.com/7StrccCsmE— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरे, संजय राऊतांना अटक करून कसून चौकशी करावी,” तुषार भोसलेंची मागणी
हेही वाचा…सरकारचा हलगर्जीपणा..,! “केंद्राने निर्यात शुल्क लावले, बंदरात ८०० टन कांदे सडले!
हेही वाचा…“५० खोक्यांच्या जीवावर पक्ष फोडून महाराष्ट्रात चिखल करणाऱ्या भाजपविरोधात इंडियाची बैठक”
हेही वाचा…“हातात तलवार घेऊन शक्तीप्रदर्शन करणं बांगरांना महागात पडलं,” आता पोलिस स्टेशनच्या चकऱ्या मारव्या लागणार
हेही वाचा…“इकडे मुलीची मंत्रालयात अजित पवारांसोबत भेट अन् तिकडे नवाब मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा”