मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत जाहीर सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर देखील हल्लाबोल चढवला. त्यानंतर संतोष बांगर यांनी कावड यात्रेच्या माध्यमातून ठाकरेंना उत्तर दिलं. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या एका गोष्टीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक
उद्धव ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढला. या कावड यात्रेत संतोष बांगर यांनी हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवली. याबाबतच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी पोलिस ठाण्यामध्ये संतोष बांगर यांच्यावर आर्मस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”
दरम्यान, कावड यात्रेत संतोष बांगरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ बांगर समर्थकांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. तसेच यावेळी त्यांना भेट देण्यात आली. मात्र म्यानातून भेट मिळालेली तलवार आमदार संतोष बांगर यांनी बाहेर काढून हातात घेऊन नाचवली. या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“इकडे मुलीची मंत्रालयात अजित पवारांसोबत भेट अन् तिकडे नवाब मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा”
हेही वाचा…“सरकारमधीलच ‘हा’ आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत”
हेही वाचा…दोन महिन्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, ११ दिवस राज्यात “शिवशक्ती जागर” यात्रा काढणार
हेही वाचा…“महायुतीत वादाची ठिणगी..,! राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न? वजन असणा-या जिल्ह्यात कुरबुरी?
हेही वाचा…बंडखोरांना मोठा धक्का, पक्षातून फुटलेल्यांना पदावरून तात्काळ दूर करा, मुंबई कोर्टात याचिका दाखल