मुंबई : मनी लॉंड्रिंग प्रकरणात दोन महिन्याच्या वैद्यकीय जामीनावर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यातच नवाब मलिकांची मुलगी सना मलिक यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर मलिकांना वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”
मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना दोन महिन्याचा जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी नवाब मलिकांची त्यांच्या निवासस्थानी भेटी घेतल्या. यातच नवाब मलिक कोणत्या गटात जाणार ? याची चर्चा जोरदार सुरू होत असतांना आज सना मलिकांनी अजित पवारांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.
हेही वाचा…“जनतेला बनवलं भिकारी आणि म्हणे शासन आपल्या दारी”
दरम्यान, नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून आणखी एक दिलासा मिळाला आहे. हमीदार सादर करण्यासाठी नवाब मलिक यांना वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. नवाब मलिक यांची १४ ऑगस्टला जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर आज सना मलिकांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारमधीलच ‘हा’ आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत”
हेही वाचा…दोन महिन्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, ११ दिवस राज्यात “शिवशक्ती जागर” यात्रा काढणार
हेही वाचा…“महायुतीत वादाची ठिणगी..,! राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न? वजन असणा-या जिल्ह्यात कुरबुरी?
हेही वाचा…बंडखोरांना मोठा धक्का, पक्षातून फुटलेल्यांना पदावरून तात्काळ दूर करा, मुंबई कोर्टात याचिका दाखल
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक