मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुती सरकारच्या काळात अनेक प्रकल्प बाहेरील राज्यात गेल्याची टिका झाली. यामुळे महाराष्ट्रात येणारी गुंतवणुक कमी झाली असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला. परंतु यातच आता २०२३-२४ या आर्थिक वर्षात विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
हेही वाचा…““सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत”
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, २०२२-२३ या आर्थिक वर्षात रू १,१८,४२२ कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करून पाहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहिती सुध्दा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार ३६, ६३४ कोटी रूपये गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका
दरम्यान, दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन. असंही त्यांनी म्हटलंय.
आनंदाची बातमी !
2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.
डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या… pic.twitter.com/fCOtzJ627k— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”