मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर पान-गुटखा, तंबाकू, पानमसाला, ऑनलाईन गेमिंक अशा अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरानं देखील या जाहिराती केल्या. त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर तेंडुलकरांनी अशा जाहिराती करणार नसल्याचं सांगतिलं. परंतु तशाच प्रकारची पुन्हा जाहिरात तेंडुलकरांनी केली असल्याने आता कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला
अशा जाहिराती करणार नसल्याचं वचन सचिन तेंडुलकरनं आपल्या वडिलांना दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाखू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. मात्र तरीही त्यानं केलेल्या एका जाहिरातीवरून कडू संतप्त झाले. आम्ही ३० तारखेला सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहोत. त्यांना आम्ही ३० तारखेपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी यासंदर्भात त्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार आहोत. असंही कडू यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…
दरम्यान, भारतरत्न असणाऱ्या माणसानं कोणत्या जाहिराती कराव्या किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरूणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही निषेध विरोध करू. ३० तारकेला पुढील आंदोलनची दिशा ठरवू. असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,