बीड : काल राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका उडला. अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. तर हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर बीडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर जोरदार टिकास्त्र सोडलं. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर पलटवार केलाय.
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…
१९९२-९३ आणि ९४ साली खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला? तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. झी टिव्हीच्या तिकडे दगडफेक झाली आहे. राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं. नंतर फोन आला भुजबळांचा राजीनामा घेऊ नका. त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतला. असा आरोप देखील भुजबळांनी शरद पवारांवर लावला. तसेच शरद पवार म्हणतात, माझ्यापासून काही शिकला की नाही ? होय आम्ही शिकलो. पण धनंजय मुंडे यांचा इतिहास तुम्ही काढला. साहेब तुम्ही कुठून कुठे आलात ? ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती. पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. तुम्ही आणि मी महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत
दरम्यान, भुजबळांच्या टिकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधला. बीडकरांना सलाम. शरद पवार यांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्ही बीडकरांची भूमिका होती. त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा. ज्यांचं खाल्लं, प्यायलं. त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत. असा टोला आव्हाडांनी अजित पवार गटावर केला.
बीडकरांना सलाम!
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!!ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.#Armstrong
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला