बीड : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सभांचा धडाक सुरू केला आहे. अलिकडेच त्यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. तर काल मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी भाजपसह अजित पवार गटावर टिका केलीय. आता आता उद्या शरद पवारांच्या सभेला उत्तर सभा म्हणून अजित पवार यांची बीड येथे सभा पार पडणार असून आता उद्यापासून राज्यव्यापी दौरे सुरू होणार असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय.
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं
राज्यातील जनतेसमोर पक्ष म्हणून अजित दादांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांवर वेगवेगळ्या जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा जनता दरबारसुद्धा सुरू करण्यात आला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. पक्षाची संघटना बांधणी सुरुच आहे. परंतु त्याचबरोबर राज्यव्यापी दौरेही करणार आहोत. पक्षाची भूमिका मांडून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. हे सगळे करताना महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. अजित पवार हे कामाने झपाटलेले विलक्षण नेतृत्व आहे. शब्दाचा पक्का माणूस आहे. या नेतृत्वाखाली काम करत असताना तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.
हेही वाचा…“महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात भाजप काॅंग्रेसला फोडू शकणार नाही”
उद्याच्या निवडणुका अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर आम्ही लढवू असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा बीड येथे २७ ऑगस्टला होत असून त्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आज पत्रकार परिषद घेतली.
READ ALSO :
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा
हेही वाचा…“अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ?” बंडखोर आमदारानी दिलं चॅलेंज