अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू करून दिलीय. राज्यात महायुतीत भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचाही गट सामील झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यातच आता २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये जागा वाटपांवरून आता राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“शिवसेना काॅंग्रेस सत्तेत आहे, काॅंग्रेसला थोडं थांबवलंय”, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून खळबळ
दक्षिण अहमदनगर मधून सध्या सुजय विखे पाटील भाजपचे खासदार आहेत. आगामी निवडणुकीत मागील काही कामांचा आढावा घेतला तर सुजय विखेंनाच भाजप उमेदवारी देणार असल्याचं सुतोवाच आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके उभे राहण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकताच उरली नाहीय”
निलेश लंके सध्या अजित पवार गटात असून ते सत्तेत असले तरी राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ६ आमदार आहे. तर तीन आमदार भाजपचेच आहे. मागील निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप उभे होते. यातच आता काॅंग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचं नाव देखील घेण्यात येत आहे. जर बाळासाहेबांना उमेदवारी दिली तर याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी देण्यात येईल? ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा
हेही वाचा…“अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ?” बंडखोर आमदारानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं
हेही वाचा…“महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात भाजप काॅंग्रेसला फोडू शकणार नाही”
हेही वाचा…“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला..,” आव्हाडांचा भाजपवर निशाणा