मुंबई : भारतीय अंतराळ संस्थेच्या शास्त्रांनी चांद्रयान ३ मोहिम २३ ऑगस्टला फत्ते केली. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेनंतर भारतीय शास्ज्ञनांचे जगभरातून कौतुक केलं जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“भाजप अन् मोदी यांची सत्ता काढून नव्या पिढीच्या हाती देणं महत्वाचं”, शरद पवारांचं सुचक विधान
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेलं आणि यशस्वी देखिल झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं. तर EVM मशीन भाजपला मतदान करू शकतं. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
हेही वाचा…“मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर..,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्याबाबत देखील आव्हडांनी म्हटलंय. हसन मुश्रीफ साहेब मी कोल्हापूरच्या सभेत आपलं नाव देखिल घेतलं नव्हतं. आपण माझ्यावर वैयक्तिक का टिका केली हे समजलेच नाही. कोल्हापूरकरांच्या मनात साहेबांविषयी असलेलं प्रेम त्या ठिकाणी झालेली गर्दी आणि साहेबांचं झालेले स्वागतं यामुळे तुम्ही अस्वस्थ झालात हे मी समजू शकतो. असुद्या… एका छोट्या कार्यकर्त्यावर एवढ्या मोठ्या व्यक्तीने टिका करणं हे कधीतरी बर असत.
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेलं. आणि त्यात यशस्वी देखिल झाले.
मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं.
विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिवसेना काॅंग्रेस सत्तेत आहे, काॅंग्रेसला थोडं थांबवलंय”, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून खळबळ
हेही वाचा…“भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकताच उरली नाहीय”
हेही वाचा…“नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात, “, मलिकांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवलं?
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास