कोल्हापूर : 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे, मत देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आपण बारकाईनं लक्ष ठेवू, सत्तेचा गैरवापर कुणी केला ? शेतकऱ्यांचं नुकसान कोणी केलं, कांद्यांचं नुकसान कोणी केलं? ऊस उत्पादकांना अन्यायकारक वागणूक कोणी दिली ? तरूणांना बेरोजगारीत कुणी ढकलंल? या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेऊ. हे सर्व आपल्याला बदलायचं असेल तर भाजप आणि त्यांच्याबरोबर जे कोणी नरेंद्र मोदींच्यासोबत आहेत त्यांचं सरकार काढून नव्या पिढीच्या हाती सत्ता देणं आणि या नव्या पिढीमार्फत सरकार चालवण्याची कामगिरी आपल्या सर्वांना करायला लागेल. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा…शरद पवारांच्या विचारांपासून दुर जाणे म्हणजे गद्दारीच
काल कोल्हापूरात राष्ट्रवादीची जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवारांनी अजित पवारांसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. असा भ्रष्टाचार तुम्ही केलेला असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही राज्याचा असेल किंवा कुठल्याही जिल्ह्याचा असेल त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवणं, ईडीचं काम आहे. पण ते काम न्यायानं केलं पाहिजे. सत्तेचा गैरवापर करून, राजकारण करून सत्तेचा हवा तसा वापर करून लोक तयार होत नाहीत. तर तपास यंत्रणांचा वापर करणार असतील तर अशा लोकांना आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप
दरम्यान, आता माझ्या लक्षात आलं की देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि तिथं त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि दोन नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असं म्हटलं. पण खरंच जर याची माहिती मोदींना असेल आणि त्यामुळं जर त्यांनी कोल्हापुरात काही कारवाई केली असेल तर मी त्यासंबंधी काही तक्रार करणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय..
READ ALSO :
हेही वाचा…“मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर..,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले”, विरोधी पक्ष नेत्याचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील”
हेही वाचा…“सत्ताकारण जरूर करावं पण.., ” सध्याच्या राजकारणावर गडकरींची नेत्यांना चपराक
हेही वाचा…शिंदेंच्या आमदारांचं ६ हजार पानी उत्तरात अनेक दाखले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष्य