बीड : काल राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका उडला. अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. तर हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर बीडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर टिका करताच सभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यानंतर छगन भुजबळांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. यावरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने भुजबळांवर निशाणा साधलाय.
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा शरद पवार यांच्या विरोधात एका मंत्र्यांचे सूर निघायला लागले. त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपची आरती गायली तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या. यातच सर्व आलं. कारण बारामती असो किंवा बीड संपुर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. असं रोहित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,
दरम्यान, शरद पवार यांचे संस्कार आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर टीका टिप्पणी करायचं नाही म्हणून नाही तर आम्ही वैयक्तिक काही गोष्टी काढल्या तर भुज आणि बळ जाईल. किरीट सोमय्या पैक्षा बैक्कार परिस्थिती होईल. यानंतर साहेबांवर वैयक्तिक टिका केल्यास तसेच उत्तर मिळेल. अस राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबुब शेख यांनी म्हटलंय.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे संस्कार आहेत कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर टीका टिप्पणी करायच नाही म्हणून नाहीतर आम्ही वैयक्तिक काही गोष्टी काढल्या तर “भुज” आणी “बळ” जाईल किरीट सौमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल. यानंतर साहेबांवर वैयक्तिक टिका केल्यास तसेच उत्तर मिळेल..!
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) August 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”
हेही वाचा…““सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत”
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल