बीड : काल राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका उडला. अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. तर हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर बीडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर टिका करताच सभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यानंतर छगन भुजबळांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. यावरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने भुजबळांवर निशाणा साधलाय.
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका
सध्या संधी मिळेल तेव्हा भुजबळ साहेब पवार साहेबांवर वेगवेगळे आरोप करत असतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना यातला एकही आरोप त्यांना आठवला नाही का ? आता होत असलेले आरोप म्हणजे निव्वळ केलेली गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड आहे. पब्लिक सब जानती है भुजबळ साहेब असं म्हणत राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”
बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा शरद पवार यांच्या विरोधात एका मंत्र्यांचे सूर निघायला लागले. त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपची आरती गायली तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या. यातच सर्व आलं. कारण बारामती असो किंवा बीड संपुर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. असं रोहित पवारांनी म्हटलं.
सध्या संधी मिळेल तेव्हा भुजबळ साहेब पवार साहेबांवर वेगवेगळे आरोप करत असतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना यातला एकही आरोप त्यांना आठवला नाही का? आता होत असलेले आरोप म्हणजे निव्वळ केलेली गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड आहे.
पब्लिक सब जानती है भुजबळ साहेब !— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”
हेही वाचा…““सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत”