बीड : भाजपच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून दोन महिन्यासाठी सुट्टीवर गेलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. देवदर्शन घेतल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात ११ दिवस शिवजागर यात्रा काढणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होणार नसल्या तरी कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी व्हावे, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”
पक्षात नेहमी डावललं जात आहे. अनेकदा निवडणुकीच्या आधी उमेदवारीच्या यादीत चर्चा केली जाते. परंतु सातत्याने उमेदवारी नाकारण्यात येते. असं म्हणत पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे दोन महिन्याच्या सुट्टीवर जात असल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर जाणार अशा चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र त्या चर्चांचं पंकजा मुंडे यांनी खंडन केलं होतं.
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”
दरम्यान, दोन महिन्याच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे ११ दिवस महाराष्ट्रात शिवशक्ती जागर यात्रा काढणार असून महाराष्ट्रातील ज्योतिरलिंग, शक्तीपीठाचं जाऊन देवदर्शन घेणार आहे. यावेळी कोणत्याही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी होणार नाहीत. परंतु कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असं आव्हान देखील पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुतीत वादाची ठिणगी..,! राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न? वजन असणा-या जिल्ह्यात कुरबुरी?
हेही वाचा…बंडखोरांना मोठा धक्का, पक्षातून फुटलेल्यांना पदावरून तात्काळ दूर करा, मुंबई कोर्टात याचिका दाखल
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”