पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून इतर पक्षातील पालकमंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचं वजन असणाऱ्या भागात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून इतर पक्षातील पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे महायुतीत काही आलबेल नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”
राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना अशाच प्रकारचा आरोप करण्यात आला होता. या कारणांमुळे शिवसेनेतून तसेच महाविकास आघाडीतून शिंदे गट बाहेर पडला होता. आता महायुतीत देखील असाच आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊनही त्यांना अद्याप पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीय. त्यामुळे ज्याठिकाणी राष्ट्रवादीचं वचर्स्व आहे. त्याठिकाणी शिंदे आणि भाजपमधील पालकमंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून दवाब आणला जात आहे. याबद्दल शिंदे आणि भाजपची नाराजी देखील उघड उघड दिसून येत आहे.
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’
दरम्यान, पुण्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पालकमंत्री आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून पुण्यात अजित पवार बैठका घेत आहेत. गडचिरोली, रायगड, नाशिक, कोल्हापूर आणि पुण्याचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीला देण्यात यावं, अशी मागणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. त्यामुळे महायुतीत आता वादाची ठिणगी पडलीय का ? असा सवाल देखील निर्माण होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बंडखोरांना मोठा धक्का, पक्षातून फुटलेल्यांना पदावरून तात्काळ दूर करा, मुंबई कोर्टात याचिका दाखल
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”
हेही वाचा…“जनतेला बनवलं भिकारी आणि म्हणे शासन आपल्या दारी”
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”