मुंबई : आगामी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्याच सरकारमधील आमदार राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर आगामी हिवाळी अधिवेशनात बहुजन समाजातील ५८ जातींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकारमधीलच आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याने सर्वसामान्यांचं सरकार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर शंका निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया येत आहे.
हेही वाचा…“जनतेला बनवलं भिकारी आणि म्हणे शासन आपल्या दारी”
हिंदू बहुजन महासंघाच्या वतीने आता महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत दोन मोठे ठराव मांडण्यात आले. त्यातील पहिल्या ठरावात हिंदू बहुजन साहित्य समेंलन घ्यायचं आणि दुसरं हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढायचा, त्यापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन दिलं जाईल. असं नरेंद्र बोंडकेर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”
दरम्यान, हिंदू बहुजन समाजातील ५८ जातींना आरक्षण मिळावं, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केली तर मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही. परंतु मागणी मान्य न झाल्या, येत्या हिवाळी अधिवेशनात आम्ही मोर्चा काढणार अशी भूमिका नरेंद्र बोंडेकर यांनी व्यक्त केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दोन महिन्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, ११ दिवस राज्यात “शिवशक्ती जागर” यात्रा काढणार
हेही वाचा…“महायुतीत वादाची ठिणगी..,! राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न? वजन असणा-या जिल्ह्यात कुरबुरी?
हेही वाचा…बंडखोरांना मोठा धक्का, पक्षातून फुटलेल्यांना पदावरून तात्काळ दूर करा, मुंबई कोर्टात याचिका दाखल
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”