जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तर दुसऱ्या बाजूला संपुर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यातच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र पाठवले आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम अन् दुसरीकडे शेतकऱ्याने घेतला ग’ळ’फा’स’
मनोज जरांगे पाटील यांना वंचितने मराठा आरक्षणाच्या समर्थनाचे पत्र पाठवले आहे. वंचित वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या सविताताई मुंढे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जात ते पत्र दिले. मी मनोज जरांगे पाटील यांना हा सल्ला दिला की, सकल मराठा आरक्षणाची लढाई मोठी आहे. त्यात तुमची आवश्यकता महत्त्वपूर्ण असून गरिब मराठा समाजाला तुमची गरज आहे. निजामी मराठे रयतेच्या मराठ्यांना पुढे जाऊ देत नाहीत. या लढाईत मी आणि माझा पक्ष सदैव आपल्यासोबत आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…” राज्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळलं, अन् देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये पक्षाचा प्रचार करताहेत
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचं पत्र पोहचलं असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी दोन घोट पाणी घेतलं आहे. यातच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असंही मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आज मराठा आरक्षणाच्या समर्थनाचे पत्र सोपवले. वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या सविताताई मुंढे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जात ते पत्र दिले.
मी मनोज जरांगे पाटील यांना हा सल्ला दिला की, सकल मराठा आरक्षणाची लढाई मोठी आहे. त्यात तुमची आवश्यकता महत्त्वपूर्ण… https://t.co/s2ucUwfiWA pic.twitter.com/rfTI5MUmG9
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस