नाशिक : मराठा आरक्षणासाठी नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना आंदोलकांनी जाब विचारला आणि समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानुसार आज हेमंत गोडसे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
हेही वाचा…” राज्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळलं, अन् देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये पक्षाचा प्रचार करताहेत
सकाळी मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपविला आहे. तसेच काॅंग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा? शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर
दरम्यान, मराठा आरक्षणावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाड्या आडवल्या जात आहे. यातच बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा घरावर जोरदार दगडफेक करून गाड्या जाळून टाकल्या जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम अन् दुसरीकडे शेतकऱ्याने घेतला ग’ळ’फा’स’