पुणे : Pune bypoll election : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) पार्श्वभूमीवर रोज नव्या घडामोडी समोर येत आहे. नेत्यांच्या भाषणाच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरू झाला आहे. सर्सार्यातच आता हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री दिले.
हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत… काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटीला, मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली
उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ मार्चला याचा निकाल लागणार आहे. मतदानाला एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांसोबतच सर्वपक्षीय नेते आज मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर भर देताना दिसून येत आहेत. आजही सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते शहरात तळ ठोकून आहेत.
Read also
- हेही वाचा…“पुण्यात पैसाचा पाऊस, भाजपवर आरोप, कार्यकर्त्यांना अटक ” रवींद्र धंगेकरांकडून धरणे आंदोलन
- हेही वाचा…सत्तासंघर्षाचा पेच मिटला, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू
- हेही वाचा..““कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न”, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- हेही वाचा..““निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर