पुणे : खासदार सुप्रिया सुळे समजुतदारपणा दाखवतात, पण अजित पवार सगळ्यांना चांगले समजून आहेत. ते बरोबर सगळ्यांना नीट करतात. त्यामुळे आम्हाला सुप्रिया सुळे नको अजित पवार यांच्याकडे तालुक्यांची सुत्रे द्या. अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील मार्केट यार्ट परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात केली.
जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
राष्ट्रवादी कॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्यासंबंधी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार, मावळचे आमदार सुनील शेळके, यांच्यासह तालुका अध्यक्ष उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष, निरीक्षक व इतर पदाधिकाऱ्यांना देखील या बैठकीत बोलवण्यात आले होते.
“कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षातील गटबाजीबाबत कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणे शरद पवार यांच्याकडे मांडली. गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॅंग्रेसचा पराभव झाला. पक्षातील गटाबाजीमुळेच राष्ट्रवादी सत्तेपासून दुर जात आहे. त्यामुळे भोर, वेल्हा आणि मुळशी तालुका अजित पवार यांच्या ताब्यात घ्यावा. खासदार सुप्रिया सुळे सगळ्यांना समजूतदारपणा दाखवतात. पण अजित पवार सगळ्यांना ओळखून आहेत. ते सगळ्यांना नीट करतील असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..
दरम्यान, आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याचबरोबर पुढे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका देखील येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडल्याने शिंदे-फडणवीस सरकारला ठक्कर देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघितलं जातंय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी चांगलाच जोर लावण्याच्या तयारीत दिसत आहेत.परंतु अशा प्रकारच्या गटबाजीमुळे राष्ट्रवादी अडचणीत येण्याची शक्यता पाहता यावर आता शरद पवार काय निर्णय घेतात. ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “बुलडोझर बाबा तुमच्या राज्यातील कायदा अन् सुव्यवस्था सुधारा”
- “40 गद्दार आमदार, अन् 13 खासदार गद्दारांनी या वर्षात तरी निवडणुक घेऊन दाखवावी”; आदित्य ठाकरेंचा इशारा
- नितेश राणेंवर रूपाली पाटील भडकल्या, म्हणाल्या, “टिल्या बेडकांनी धरणात..”
- योगींच्या जाहिराती महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय?
- “राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी