मुंबई : काश्मिर फाईल्स चित्रपटाबद्दल देशात एव्हाना राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. काश्मिर फाईल्स चित्रपट राज्यात टॅक्स मुक्त करावा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विधानसभेत भाजपच्या आमदारांना सुनावलं.
मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा ‘खळखट्याक’; आयपीएलसाठी परराज्यातून आणलेल्या सर्व बसेस फोडल्या
काश्मिर फाईल्स चित्रपटाबद्दल बोलतांना अजित पवार म्हणाले की, जर हा चित्रपट टॅक्समुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनेच घेतला तर संपुर्ण देशाला लागू होईल. हा चित्रपट महाराष्ट्रातच टॅक्स मुक्त केला तर भेदभाव निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रातचं काय? कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत करा ना टॅक्समुक्त झाला पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यानंतर विधानसभेत भाजपच्या आमदारांनी गोंधळ निर्माण केला.
अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोवीड काळात राज्य सरकारपुढे मोठे आव्हान होती. तरी देखील राज्य सरकारने चांगली कामगीरी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विकास निधीवर केलेल्या वक्तव्यांबाबत अजित पवारांनी टोला लगावला. काॅंग्रेसला इतके कोटी, राष्ट्रवादीला इतके कोटी आणि शिवसेनेला इतके कोटी यावरून एखाद्या पक्षाकडं खात असलं की तो विभागातील पैसे त्या पक्षाला असं नसतं.
“एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”
दरम्यान, भाजपनेते नितेश राणेंसह, आशिष शेलार यांनी काश्मिर फाईल्स टॅक्समुक्त करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील हा चित्रपट सर्वांनी बघावं असं आव्हान केलं होतं. यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर आज अजित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला.
Read also:
- स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह यांच्या मुळ गावी झाला भगवंत मान यांचा शपथविधी; पंजाबनंतर आपचं पुढचं नियोजन ठरलं
- नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
- दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
- काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
- “जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका