मुंबई : नवरात्र उत्साहात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारावाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सुट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना बारावाजेपर्यंत गरबावर नाचता येणार आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे.
“कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, गणपती व गरबा १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्णय झाले असतील तर हिंदुंचा खरा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार आहेत ? असा खोचक सवाल रूपाली पाटील यांनी एकनाथ शिंदे सरकारला केला आहे.
“देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.
गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
यावर्षी नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रौत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.
Read also
- “महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करतय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
- “त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर