मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनवण्याचा मानस बोलून दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार याबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या 228 व्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री विषयी भाष्य केलं आहे.
“पैसे खर्च करून आदित्य ठाकरे माणसं आणतायेत”; संजय गायकवाडांची टिका
उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्र्यांविषयी भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यामध्ये सर्वात जास्त लोकांची पंसती ही चार वेळी संसद पटू, आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या असूनही सुप्रिया सुळे यांनी आपली राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं.
“वेळ पडली तर आम्हाला गोळ्या घालून ठार मारा, मात्र…;” मिटकरींचा भाजपला आवाहन
त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचंही नाव महिला मुख्यमंत्र्यांच्या यादीत घेतलं जात आहे. त्या भाजपच्या माजी आमदार राहिल्या असून त्यांनी राज्यात वेगवेगळी मंत्रीपद देखील भुषविली आहेत. याच बरोबर काॅंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर या देखील मुख्यमंत्र्यांच्या शर्यरीत आहेत.
“शिवाजी महाराजांचा अपमान करणे हा भाजपचाच अजेंडा”; सेनेची भाजपवर जहरी टिका
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं नाव देखील घेतलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात महिला मुख्यमंत्री म्हणून कुणाला संधी मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. देशाच्या आणि उत्तर प्रदेशच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुचेता कृपलानी यांना मान मिळाला आहे. तर देशातील इतर राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी पद भुषविली आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात कुणाला संधी मिळणार ते ही महत्वाचं आहे.
Read also
- “मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे”; शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी
- “जितका चिखल, तितकेच कमळ अधिक फुलणार”; नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसला प्रत्युत्तर
- “उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”
- “चंद्रकांत खैरे पिसाळलेले वक्तव्य करताहेत”; 5 कोटीच्या आरोपावर शिंदे गटाची प्रतिक्रिया
- “तुम्ही वेगळी ओळख करायला जाता अन् घोटाळा होतो”; आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार