मुंबई : मागील काही दिवसापासून चर्चेत आलेला ड्रग्ज माफिया ललित पाटलाला अखेर पोलिसांनी चेन्नई येथे पकडले आहे. तब्बल पंधरा दिवसानंतर पोलिसांना हुलकावणी देत ललित पाटील फरार झाला होता. ललित पाटील याला पकडण्यासाठी पोलिसांचे १० पथके तैनात करण्यात आले होते. चेन्नई येथे असल्याची पोलिसांना टिप मिळाल्यानंतर चेन्नई गाठून ललित पाटलाच्या रात्रीच मुसक्या आवळल्या. त्याला आता पुण्यात आणलं जाणार आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधलाय.
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला आश्रय देणारा चाळीसगावातील ती व्यक्ती कोण ? ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रूग्णालयातून फरार झाला होता. तिथेून तो चाळिसगावात येऊन तीन दिवस राहिला. अशी माहिती समोर येत आहे. चाळीसगावात त्याला आश्रय देणारी व्यक्ती कोण ? त्याच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे ? असा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलाय. तो कोणाच्या सांगण्यावरून चाळीसगावात आला होता? याचे उत्तर मिळवण्यासाठी ललित पाटीलची नार्को टेस्ट करावी. कोणताही राजकीय दबाव झुगारून पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी व सत्य जनतेसमोर आणावे. ड्रग्ज माफियाच्या चाळीसगावातील त्या आश्रयदात्याच्या मुसक्या आवळाव्यात. अशी मागणी देखील खडसेंनी केलीय.
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
दरम्यान, ससून रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य काय आहे हे राज्यातील जनतेच्या समोर यायला हवे. ललित पाटीलला तुरूंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये. आरोपीला पळायला कोणी मदत केली होती. महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद होता? रूग्णालयातून ड्रग्ज पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते? ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे राज्यात कुठपर्यंत पोहोचले आहे. या सर्वांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ड्रग माफिया ललित पाटील याला आश्रय देणारा चाळीसगावातील ती व्यक्ती कोण?
ड्रग माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला होता. तिथून तो चाळीसगावात येऊन तीन दिवस राहीला. अशी माहिती समोर येत आहे. चाळीसगावात त्याला आश्रय देणारी व्यक्ती कोण ? त्याच्या मागे कोणती राजकीय…— Eknath Khadse (@EknathGKhadse) October 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“इंजिनाच्या वाफेचा कुणाला चटका बसणार ?”, राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला इशारा
हेही वाचा…शरद पवार ‘या’ लोकसभा मतदारसंघात मैदान मारणार, आढावा बैठकीत सगळं ठरलं
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप