राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरून जोरात राजकारण सुरु होते. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण पाठिंबा देणार यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये चुरशीची लढत चालू होती. शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची तब्बेत बिघडली; लिलावती रूग्णालयात उपचार सुरू
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. संभाजीराजेंचे वडील मालोजीराजे यांनी संभाजीराजे आणि भाजप यांच्यातील छुप्या युतीचा गौप्यस्फोट केला आहे. संभाजीराजेंमुळे राजकीय नुकसान नको म्हणून शिवसेनेने मराठा समाजाचे आणि कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने अतिरिक्त उमेदवार दिला असल्याने भाजपने देखील ही जागा लढण्याची तयारी केली. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचीट; आता समीर वानखेडेंवर कारवाई होणार का?
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. विविध पक्षाच्या बलानुसार भाजपचे दोन, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा 1 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. व उर्वरीत एका जागेसाठी शिवसेनेने एक उमेदवार घोषित केला आहे. या जागेसाठी संभाजीराजे भोसले उत्सुक होते. परंतु, शिवसेनेते प्रवेश नाकारल्याने शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली. भाजपनेही सहाव्या जागेसाठी निवडणुक लढण्यासाठी कंबर कसली. सहाव्या जागेसाठी भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये धनंजय महाडिक यांचे नाव समोर आले.
संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी ; नाना पटोलेंचा शिवसेनेला घरचा आहेर
मतांचे गणित पाहिल्यास भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडी जर एकसंध राहिल्यास मित्र पक्षांचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. तिसऱ्या जागेसाठी भाजपला १३ मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली होती. भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त १३ मतांची गरज आहे.
सदाभाऊंनी आता राजकीय संन्यास घ्यावा; भाजपने विश्रांतीचा सल्ला दिल्याने मिटकरींचा खोतांना टोला
तर कोल्हापुरात भाजपच्या विस्तारासाठी धनंजय महाडिकांची मदत होऊ शकते, याचा विचार करुन तिसरा उमेदवार म्हणून पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला त्यामुळे जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यासाठी धनंजय महाडिक हा एक चांगला पर्याय भाजप समोर होते त्यामुळे अखेर सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान या जागेसाठी धनंजय महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज देखील भरला. उमेदवारी जाहीर होताच धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, “राज्यसभेवर तिसरी जागा भाजपची असणार आहे. यासाठी आम्हाला 10 मतांची आवश्यकता असून त्याची व्यवस्था आम्ही केलीय. भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
“सदाभाऊ खोत, तुम्ही आता विश्रांती घ्या, भाजपचा सल्ला”; विधान परिषदेसाठी खोतांचा पत्ता कट
राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण 7 उमेदवार रिंगणार उतरले आहे. ३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख त्या दिवशी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढत होणार हे स्पष्ट होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तोही कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. राज्यसभेच्या ६ जागापैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे.
मातोश्रीवरील हनुमान चालिसाचं कार्यक्रम मोदींनी नवनीत राणांना दिलं
कोण आहेत धनंजय महाडिक?
2004 मध्ये महाडिक यांनी कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षाची उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. 10 जानेवारी 2017 रोजी महाडिक, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता संभाजीराव माने, कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास आणि इतर 400 जणांना पुणे-बेंगळुरू मार्गावरील वाहतूक रोखल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 2017, 2018 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसद रत्न पुरस्कारही मिळाला आहे. लोकसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व केल्यानंतरत्यांनी 2019 च्या निवडणुकीत त्याच जागेवरून भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र 2019 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते संजय मंडलिक यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला.
Read also:
- “तर मग घोडेबाजारांचा प्रश्न निर्माण होणार नाही” ; राज्यसभेच्या निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला फार्म्युला
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”