मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आज पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी अर्ज सादर केला आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला 2 जागांवर विजय निश्चित असताना तिसरा उमेदवार देऊन भाजपने मोठी खेळी केली आहे. तसेच महाविकास आघाडीने अगोदर राजकीय घोडेबाजार थांबवयाला हवा होता , असा घणाघात देखील राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केला आहे.
“मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तिन्हींही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आमचे तीन त्यांचे तीन तसेच त्यांनी एक उमेदवार परत मागे घेतला पाहिजे. मग घोडेबाजारांचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु जरी त्यांनी तो उमेदवार ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
भाजपचे तिन्ही उमेदवार राजकारणात सक्रीय असून ते महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे राज्यातील सदस्य यांना मतदान करणार आहेत आणि ते निवडून येतील अशी आशा आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेकडून सहावा उमेदवार म्हणून संजय पवार यांना उमेदवारी देऊन मोठा पेच निर्माण केला आहे. त्याचाच डाव खेळत भाजपने देखील धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.
“बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. तर काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांच्या नावाची चर्चा आहे. यासाठी येत्या १० जून रोजी मतदान होत असून अर्ज सादर करण्याची शेवटची ३१ मे शेवटची तारीख आहे.
Read also:
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती