नवी दिल्ली : देशात गेल्या अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राम मंदिराला अखेर मान्यता मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर राम मंदिराचं काम देखील अयोध्यामध्ये सुरू झालं आहे. परंतु त्याच अगोदर युपीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि त्याची आरती देखील केली जात आहे. यावरून काॅंग्रेसने त्यावर खोचक टोला हाणला आहे.
“आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील
अयोध्या-गोरखपूर हायवेजवळ भरतकुंडजवळ योगी आदित्यनाथ य़ांचं मंदिर उभारण्यात आलं आहे. प्रभाकर मौर्य यांनी यांनी योगीच मंदिर उभारलं आहे. प्रभाकर हा 2014 पासून योगी प्रचारक असून त्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं काम ते करीत आहेत. तसंच ते योगींद्वारे चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचाही प्रसार करतात.
“भास्कर जाधव यांची अवकात काय? हा नाच्या आमदार”; रामदास कदमांचा हल्लाबोल
राम मंदिराचं संकल्प पुर्ण झाल्यानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारलं आहे. ते म्हणाले की, की हे मंदिर त्यांच्या संकल्पपूर्तीची साक्ष आहे. त्यांचा संकल्प होता, की जे कोणी अयोध्येमध्ये राम मंदिर बनवेल. त्यांचं मंदिर ते स्वत: उभारतील. त्यावर आता काॅंग्रेस नेते नितीन राऊत यांनी त्याचा एक व्हि़डीओ शेअर केला आहे. त्यावर सुरूवातीला 33 करोड होते. अन् आता 33.01 कोटी झाले असं खोचक कॅप्शन राऊत यांनी त्या व्हिडीओला दिलं आहे.
पहले 33 करोड़ थे अब 33.01 करोड़ हो गए। pic.twitter.com/gMzM2vf5OV
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) September 19, 2022
Read also
- “किरीट काका भाजप व शिंदे सरकारने तरी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं”, मिटकरींना डिवचलं
- मतदारसंघात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही : चंद्रकांत पाटील
- “माॅंसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याऱ्या कदमांना सुट्टी देऊ नका भावांनो”; सुषमा अंधारे भडकल्या
- “मला काही समजतं नाही, राज्यात काय नेमकं काय चाललंय”; राज ठाकरेंचं भाष्य
- “शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना असं समीकरण”; दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य