पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता दोन्ही गटांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. यातच विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पडलेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून खोचक टिप्पणी केली. त्यावर शरद पवार गटाचे नेते विलास लवांडे यांनी मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा…श्रीरंग बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता मावळवर भाजपनेही ठोकला दावा
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कालवा सल्लागार समितीची पाणीविषयक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीसाठी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली तर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यातील यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यांची नितांत गजर आहे. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा…महायुतीत गर्दी वाढली, उमेदवारांची आशा माळवली, विदर्भाचा भाजपचा बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर ?
या बैठकीवर अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. आज पहाटे पहाटेच बाल मित्र मंडळ अध्यक्ष दादांना भेटला असे समजले. शेवटी भेट नेमकी कशासाठी ? तर दादा मला वाचवा. मी तोंडाची तुतारी वाजवणार नाही. चरणावर लोटांगण घालून दादा पदरात घ्या. शेवटी महाराष्ट्राचा एकच दादा, असं मिटकरी यांनी म्हटले. त्यावर तु लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस. आमदार आहेस. त्या पदाची इज्जत घालवू नको रे बाजारू विचारवंत, असं म्हणत लवांडे यांनी मिटकरी यांची बोलतीच बंद केली.
READ ALSO :
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान
हेही वाचाजरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ
हेही वाचालोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर