मुंबई : आधी भाजपचे असलेले आणि आता राष्ट्रवादीशी सख्य जुळवलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये भाजपला खिंडार पाडण्याचे काम सुरूच ठेवले असून, मुक्ताईनगरमधल्या भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांनीआजच शिवसेनेत प्रवेश करत भाजपला जोरदार धक्का दिलेला आहे.
या सर्व नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल असून, यावेळी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे देखील या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि इतर ४ जणांचा समावेश आहे. या नगरसेवकांनी केलेल्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा बसलेला अजून मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेने भाजपच्या हातावर तुरी देऊन, निवडणुकीपूर्वीच भाजपच्या २७ नगरसेवकांना आपल्याकडे वळवले होते. परिणामी शिवसेनेने या निवडणुकीत भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. दरम्यान, हे दोन्ही धक्के जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानले जात आहेत.
Read Also :
- ‘नारायण राणे पनवती, म्हणूनच भाजपत त्यांना अडगळीचं स्थान’
- पदोन्नतीतील आरक्षणाचा जीआर रद्द न केल्यास, काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?
- ‘…तोवर राज्यातल्या लॉकडाऊन मध्ये कोणताही दिलासा नाही’, ठाकरे सरकार घेऊ शकतं निर्णय
- ‘आपलं इतक्या वर्षांचं नातं क्षणात…सगळे खंबीर राहा!’, राज ठाकरेंचे मनसैनिकांना भावनिक पत्र