मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, ठाकरे सरकारच्या ११ घोटाळेबाज नेत्यांची नावे सांगितली होती. त्यांनतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यवर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले. तसेच, या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावे आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं सांगितले. तसेच, फक्त तेच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे आहेत आणि यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.
मोठी बातमी: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी आरोप
दरम्यान, त्यांच्या या गंभीर आरोपांनंतर मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले असून, ‘मी त्यांच्यावर आत्तापर्यंत ५०-५० कोटींचे अब्रुनुकसानीचे ६ दावे दाखल केले आहेत. आता ७ वा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही आरोप केला नाही. भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही. त्यांच्यवर येत्या २ आठवड्यात फौजदारी दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात दाखल करतोय,’ असं ते म्हणाले.
‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होणार!’ वडेट्टीवारांचं विधान
‘मला माहिती होतं, माझ्यावर कधीतरी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जातील. सोमय्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाचा मी तीव्र निषेध करतो. त्यांनी दाखवलेली कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मागच्या वेळेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरांवर धाड टाकली गेली होती. त्यात काहीच आढळले नव्हते. आता यांनी मनीलाँडरींगचा आरोप केला आहे. हा शोध त्यांनी कुठून लावला? कदाचित त्यांना बिचाऱ्यांना काहीच माहिती नसावं,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
‘बाळासाहेब थोरातांची भूमिका योग्यच, राष्ट्रवादीने काँगेसमध्ये विलीन व्हावं!’
‘चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी सोमय्यांना माहिती दिली असावी. पाटील यांच्यावरच्या हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत मी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. त्यांना अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच मंत्री पद मिळालं. पण घोटाळ्यामुळे कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं,’ असं म्हणत, ‘समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून याची चर्चा करत होते. मी सुद्धा त्यांना आधीच निरोप दिला होता,’ असा इशारा देखील त्यांनी दिला.
Read Also :
- अनिल परबांच्या अडचणीत वाढ; वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश
- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती; आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी : OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ
- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेसच्या आमदाराकडून छळ; पी. एन. पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल