मुंबई : सुरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारात गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आली आहे. ज्यामध्ये सुरच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सुरतला स्थलंतरित करीत आहेत. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर याचं खापरं फोडलं आहे.
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार
मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय याचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातील तरूणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे ही खेदाची बाब असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर हजारो कोटींचे डायमंड मार्केट मुंबईतून सुरतला, बसा आता बोबंलत असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
दरम्यान, किरण जेम्मस निर्याय संचालक वल्लभ लखानी यांनी सांगितले की १९८० मध्ये व्यावसायानिमित्त ते मुंबईला गेले आणि तिथे हिऱ्यांची कंपनी सुरू केली होती. भारत डायमंड बोर्सचे मुख्यालय वांद्रे कुर्ला कॉम्ल्पेक्स, मुंबई येथे होते. त्यांनी १९९७ मध्ये सुरतमध्ये व्यवसाय सुरू केला होता. किरण जेम्सची वार्षिक उलाढाल सुमारे १७ हजार कोटी रूपये तर आणखी एक ज्वेलरी कंपनी असून त्याची ३ हजार कोटी उलाढाल आहे. त्यांनी आपला व्यवसाय मुंबईतून पुर्णपणे बंद केला असून तो आता सुरतला हलवला आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी त्यांनी सध्या विविध इमारतींमध्ये १२०० प्लॅट बांधले आहेत.
मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले…
— Supriya Sule (@supriya_sule) October 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पक्ष फुटीचा काॅंग्रेसला मोठा फायदा,” राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितच्या ‘या’ नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा