मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच राज्यात पक्ष फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलली असून याचा काॅंग्रेसला मोठा फायदा होत आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काॅंग्रेसची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या टिळक भवन मुख्यालयात पक्ष प्रवेश पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस सुलतान सिद्दीकी यांनी भिवंडीतील शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच मनसेचे राजेंद्र रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याचसोबत नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई बनसोडे व त्यांचे कार्यकर्ते तसेच जालना जिल्हा सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी
दरम्यान, राष्ट्रवादी कॅंग्रेसचे जनरल सेक्रेटरी, राष्ट्रवादी सेवा दलाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले चंगेजखान पठाण यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली आहे. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे. पठाण यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नगरपालिकेचे ते पहिले नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले होते. हाज कमिटी, मौलाना आझाद महामंडळाचे माजी संचालक अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.
आज #महाराष्ट्र प्रदेश #काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन मुख्यालयात #राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुलतान सिद्दीकी यांनी भिवंडीतील शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच मनसेचे राजेंद्र रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.#CongressFirse pic.twitter.com/LbmcaZKUqD
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार