मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं म्हणून काल नारायण राणेंना अटक झाली. नंतर जामिनावर त्यांची सुटका देखील झाली. या संपूर्ण काळात निलेश वडिलांसोबत म्हणजे नारायण राणेंसोबत होते. नारायण राणे काल दुपारी रत्नागिरीत गोळिवली येथे जेवत असताना पोलीस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
निलेश राणे आपल्या टि्वटसधून सातत्याने शिवसेना आणि सत्ताधारी ठाकरे सरकारला लक्ष्य करत असतात. आज त्यांनी काल शिवसेनेशी दोन हात करणाऱ्या कार्यकर्ते, सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. “काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी” असेही त्यांनी म्हटले आहे.
काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 25, 2021
‘जेव्हा तुम्ही आकाशाकडे बघून थुंकता, तेव्हा तीच थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते. करारा जवाब मिलेगा’ हा डायलॉग त्यांनी टि्वटवर पोस्ट केला आहे. या टि्वटमधून वेगवेगळे राजकीय तर्क-वितर्क नक्कीच काढले जातील. पण यापुढे महाराष्ट्रात सूडाचं राजकारण पाहायला मिळू शकते. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘राजनीती’ चित्रपटातील मनोज वाजपेयीचा राजकीय सभेला संबोधित करत असतानाचा हा व्हिडीओ नितेश राणेंनी पोस्ट केला आहे.
Read Also :
- नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा
- राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार
- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू
- फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात