मुंबई : महाड इथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यावरून काल दिवसभर राज्यभरात विविध ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्यात जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. यानंतर राणे संगमेश्वर इथे असताना त्यांना स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा ‘ऍक्शन मोड’, शोधलं ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य
दरम्यान, यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून, आता काँग्रेसकडूनही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. “कालची घटना दुर्दैवी वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात एकामेकांचा सन्मान करण्याची संस्कृती आहे. टीका हा राजकीय जीवनाचा अपरिहार्य भाग असतो. परंतु त्याचा स्तर काय असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला टीका म्हणता येत नाही,” असे ते म्हणाले.
दु. ४ वाजता राणेंची पत्रकार परिषद, नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा
“मुख्यमंत्री हे राज्यातील जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यांच्याबाबतीत असे शब्द वापरणं अतिशय चुकीचं होतं. आम्ही या घटनेचा निषेध करतो. त्यांच्यावरची कारवाई द्वेष पूर्ण म्हणता येत नाही. ती कायद्याची कारवाई आहे. मात्र, द्वेषाचं राजकारण असू नये. आजकाल भाजपच्या मंत्र्यांची विविध ठिकाणची भाषणं सुरू आहेत, ती ऐकली कि त्यांच्या मनात नैराश्य आलं आहे आणि त्यातून ते अशाप्रकारची भाषा करत आहेत, असं दिसून येत,” असं मत त्यांनी मांडलं.
आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरून अजूनच चिघळलेल्या भाजप-शिवसेना संघर्षांमुळे, राज्यात काल तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी भाजप पक्ष कार्यालये फोडली, जाळली. तसेच, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. महामार्ग बंद करण्यात आले, तर भाजपडकूनही शिवसैनिकांना जशास तसे उत्तर देण्यात येत होते.
Read Also :
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा
- राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार
- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू
- फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस