मुंबई : भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी आज (शनिवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटं कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.
हे पण वाचा, भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. १९९९ पर्यंत काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं वर्चस्व होतं. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण ते आम्हाला तिकीटच मिळू द्यायचे नाहीत. १९९९९ काँग्रेमधून राष्ट्रवादी वेगळा झाला आणि एका झटक्यात मी, अनिस अहमद, नाना पटोले आणि नितीन राऊत निवडून आलो, असा दावा देशमुख यांनी केला. त्यामुळे देशमुख यांच्यासह विदर्भातील नेत्यांचं तिकीट कापणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते नेते कोण? असा सवाल केला जात आहे.
हे पण वाचा, नाना पटोले राहुल गांधींना देणार ‘बर्थ डे गिफ्ट’, भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर ?
यावेळी त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून ते मंत्री होण्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसने आम्हाला वयाच्या अवघ्या २५व्या वर्षीच तिकीट दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसने आम्हाला वयाच्या २५व्या वर्षी तिकीट दिलं. पण राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. कोण कधी वर जातो तर कधी खाली येत असतो. काँग्रेस वाढवली. सहकार क्षेत्रात काँग्रेसची ताकद निर्माण केली. तरीही मला २००९ मध्ये तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे मला धक्काच बसला. पण मला समजावण्यासाठी अविनाश पांडे हेलिकॉप्टरने घरी आले होते. अहमद पटेलांशी त्यांनी बोलणं करून दिलं होतं. त्यावेळी मला चार पाच महिने आधी सांगितलं असतं तर मी मानसिकता तयार केली असती.
हे पण वाचा, ‘वडिलांसाठी अवयव दान करायचे होते, मात्र…’, केबीसीमध्ये रितेश देशमुखला अश्रू अनावर
आता अवघ्या काही दिवासांवर निवडणूक आहे, असं मी त्यांनी सांगितलं. त्यानंतर निवडणुकीला अपक्ष म्हणून उभा राहिलो. केवळ अडीच हजार मतांनी पडलो. त्यानंतरही मी कोणत्याच पक्षात गेलो नाही. उलट नवा पक्ष काढला. तसेच दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नही केले. पण कोणी तरी बूच मारलं होतं. त्यामुळे त्यात यश आलं नाही, असं ते म्हणाले.
Read Also :
- जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय महत्वाची बैठक
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे, गृहमंत्रालयाचे आदेश
- “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
- “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…