मुंबई : राज्यभर हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ७०० दवाखाने सुरू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर टक्सी आणि रिक्षा चालकांसाठी चालक मालक महामंडळ सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लिंगायत समाजासाठी बसवेश्वर आर्थिक महामंडळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतरणानंतर आज शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केला.
हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र वयोश्री योजनेचाही विस्तार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात येणार. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबर अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २०, ००० पदे भरण्यात येणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून ५ लाखांवर नेण्यात आली आहे.
हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”
त्याचबरोबर जलयुक्त शिवार. २.० अंतर्गत दुसरा ५००० गावांमध्ये आखण्यात आहे. याद्वारे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस ३ वर्ष मुदतवाढ, तर २०२३-२४ मध्ये कार्यक्रम खर्चासाठी मृद व जलसंधारणसाठी ३८४६ कोटी रूपये घोषित करण्यात आली आहे. धनगर समाजाला 1000 कोटी रुपये. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार. 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार. – धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये – 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी – महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार – 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार – अहमदनगर येथे मुख्यालय असणार – राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी
Read also
- हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
- हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा
- हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
- हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,
- हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने