नवी दिल्ली : अलिकडेच झालेल्या ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. नागालँडमध्ये BJP-NDPP आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. तर राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावरून आता राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीत टिका टिप्पणी सुरू झाली आहे.
हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्याने मनसेचे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला हाणला आहे. नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत. पवार साहेब हैं तो मुमकीन हैं. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे. अजित दादा अखेर पवार साहेबांच्या संमतीनेच सकाळच्या शपथविधीला गेले होते. या फडणवीसांच्या विधानावर शिक्कामोर्तेब का ? असा खोचक सवालही गजानन काळे यांनी केला.
हेही वाचा..“त्यांच्या घरी चाळीस- पन्नास नाही, तर हजारो खोके जातात,” संजय गायकवाड यांचा आरोप
गजानन काळे यांच्या टिकेला राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. दाढी आणि मिशा आल्या म्हणजे अक्कल येते असं काही नाही, हे आपलं ट्टिट पाहून लक्षात येते. मरण येत नाही म्हणून जिवंत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय विषयावर प्रतिक्रिया द्यावी हे अजब आहे. असं म्हणत सुरज चव्हाण यांनी गजानन काळे यांचा समाचार घेतला.
हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर
निफियू रिओ हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर नागालॅंडमध्ये पहिल्यांदाच विरोधक नसलेलं सरकार बनणार आहे. निवडणुकीनंतर तिसरा सगळ्यात मोठा पक्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूसह सगळ्याच राजकीय पक्षांनी कोणत्याही अटीशिवाय भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये एवढ्या पक्षांना विजय मिळाला आहे. तसंच इतिहासात पहिल्यांदाच नागालँडची विधानसभा विरोधी पक्षाशिवाय अस्तित्वात येईल.
दाढी आणि मिशा आल्या म्हणजे अक्कल येते असं काही नाही हे आपलं ट्विट पाहून लक्षात येते.मरण येत नाही म्हणून जिवंत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय विषयावर प्रतिक्रिया दयावी हे अजब आहे. https://t.co/hAbeZo6kRg
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 8, 2023
Read also
- हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ
- हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
- हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
- हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..
- हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार