पुणे : अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा २८ वर्षाचा बालेकिल्ला काबीज केला. कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री पुण्यात तळ ठोकून बसले असता तरी महाविकास आघाडीचे उमेदवार याठिकाणी विजयी झाले. यातच महाविकास आघाडीने कसबा सारखीच एकजुट दाखविली तर पुण्यातील भाजपचे मतदार संघ असलेलेल कॅन्टोमेंट, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघ आत्ताच डेंजरझोनमध्ये आल्याचं दिसत आहे.
हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”
मागच्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे माजी मंत्री पुणे कॅटोन्मेंट मतदारसंघातून फक्त पाच हजार मतांनी पराभूत झाले होते. तर शिवाजीनगर आणि कॅन्टोमेंटची जागा २०२४ ला आम्हीच जिंकणारच, असा दावा ते आत्तापासूनच करू लागलेच. कारण या दोन्ही जागा काॅंग्रेसनं गेल्यावेळी अवघ्या ५ हजार मतांच्या फरकाने हरल्यात .
हेही वाचा…“आघाडीने भाजपविरोधात रणशिंग फुंकले, रणनीती ठरली, प्रत्येक जिल्ह्यात सभा”
2019 ला राष्ट्रवादीची खडकवासल्याची जागा तर अवघ्या २५९५ मतांनी हरली, त्यामुळे ही जागा आम्ही काही केल्या जिंकणारच कारण दोन्ही काॅंग्रेससोबत शिवसेनेची मतंही यावेळी महाविकास आघाडीमध्ये अॅड झाली आहे. तसंच वंचितही सेनेसोबत आहे, म्हणूनच २०२४ साली पुण्यात भाजपसाठी अतिशय निराशाजनक चित्र असेल. असं राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर
दरम्यान, पुण्यात 8 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी ५ भाजप, राष्ट्रवादी २ आणि आता कसब्याच्या रूपाने काॅंग्रेसचाही एक आमदार निवडून आलाय. म्हणूनच महाविकास हा कसबा पॅटर्न भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय. असं राजकीय अभ्यासकांना वाटतंय.
Read also
- हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..
- हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
- हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”
- हेही वाचा..“त्यांच्या घरी चाळीस- पन्नास नाही, तर हजारो खोके जातात,” संजय गायकवाड यांचा आरोप
- हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर