मुंबई : विधीमंडळाचा चोरमंडळ उल्लेख केल्याने खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. हाच मुद्दा सत्ताधारी पक्षांनी लावून धरत संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. त्यानंतर त्यांना हक्कभंग समितीने नोटीस पाठवत दोन दिवसात उत्तर देण्यास सांगितले होते. त्यावर आता संजय राऊतांनी त्यावर उत्तर पाठवलं आहे.
हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,” उद्या शपथ घेणार
संजय राऊतांनी पाठवलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधानमंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला आणि विशेषाधिकार भंग आणि अवमानाची सुचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला ३ मार्च २०२३ पर्यंत सांयकाळी ६.३० वाजेपर्यंत मुदत दिली होती.
हेही वाचा..“काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
मी आपणास नमुद करू इच्छितो की, ४ मार्चपर्यंत मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो. कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. महाराष्ट्र विधानमंडळाचा आणि सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. मी स्वत: अनेक वर्ष राज्यसभेचा सदस्य असल्यानं मला आशा संसदीय मंडळाचे महत्त्व माहित आहे.
हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
मी संपुर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव केलं नसून, माझं वक्तव्य एका विशिष्ठ गटापुरते मर्यादित आहे. सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ घ्यावी. असं पत्र संजय राऊतांनी महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालाच्या प्रधान सचिवांना पाठवलं आहे.
Read also
- हेही वाचा…“आघाडीने भाजपविरोधात रणशिंग फुंकले, रणनीती ठरली, प्रत्येक जिल्ह्यात सभा”
- हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर
- हेही वाचा..“जनतेच्या मतांचा बुलडोजर या हुकूमशाही विरोधात आता फिरवावाचं लागेल”, ठाकरेंचा हल्लाबोल
- हेही वाचा..“संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की, आणखी कुठली नशा करतात”?
- हेही वाचा…मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?