पुणे : कसब्यातील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर उद्या विधानभवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. त्याआधी त्यांनी मुंबईत विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मुंबईत रवींद्र धंगेकरांचा शपथविधी होणार आहे. तसेच उद्या राज्यांचं अर्थसंकल्पही वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत.
हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान
मुंबईत रवींद्र धंगेकर यांनी काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कसबा विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खरगे यांनी धंगेकरांचं अभिनंदन केले. तसेच त्यांच्यात सविस्तर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशीही उपस्थिती होते.
हेही वाचा..“४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाही, ते देश काय सांभाळणार”?
त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मातोश्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, महाविकास आघाडी चे नेते इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Read also
- हेही वाचा..“काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..“विजयी गुलाल उधळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या,” धंगेकरांनी खरगेंची घेतली भेट
- हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे
- हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा