मुंबई : आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्ताने राज्यभरात तसेच देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. यातच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात महिला व बालकल्याण मंत्री उपस्थितीत नसल्याने भाजपचे आमदार संजय कुटे यांनी भाजपला घराचा आहेर दिला आहे. तर काॅंग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भावना मांडतांना महिला दिनानिमित्ताने एक खंत व्यक्त केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..!”बच्चू कडू खाणार तुरूंगाची हवा, कोर्टाने दिली दोन वर्षाची शिक्षा”?
आज महिला दिनानिमित्ताने सभागृहात सर्व महिला आमदार उपस्थितीत आहेत. परंतु आजच्या दिवशी तरी महिला व बालकल्याण मंत्री सभागृहात उपस्थित असायला हवे. ? असा सवाल संजय कुटे यांनी केला. तसेच मंत्र्यांला जर काम असेल तर आजच्या दिवशी माधुरी ताई मिसाळ यांच्याकडे तरी कारभार सोपवावा. अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालाच्या कार्यक्रमाला गेल्याने उशिरा झाल्याचं कारण सांगितलं.
हेही वाचा…“रवींद्र धंगेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट,” उद्या शपथ घेणार
माझे यजमान गेल्यानंतर मला एक संघर्ष करावा लागला. मी चांगल्या घरातली होती. तरीही माझ्या मुलांची नावं सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही आपल्या देशात संघर्ष करावा लागतो. यजमान गेल्यानंतर वर्ष झाले आहे तरी आमची संपत्ती मुलांच्या नावावर झालेल्या नाहीत. असं म्हणत माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना आपल्या भावना अनावर झाल्यात.
Read also
- हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”
- हेही वाचा…“आघाडीने भाजपविरोधात रणशिंग फुंकले, रणनीती ठरली, प्रत्येक जिल्ह्यात सभा”
- हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर
- हेही वाचा..“जनतेच्या मतांचा बुलडोजर या हुकूमशाही विरोधात आता फिरवावाचं लागेल”, ठाकरेंचा हल्लाबोल
- हेही वाचा..“संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की, आणखी कुठली नशा करतात”?