अहमदनगर : राज्यात अलिकडेच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर संघात भाजपला नागपुर आणि अमरावतीमध्ये फटका बसला. त्यानंतर पुण्यातील पोटनिवडणुकांमध्ये कसब्याची जागा भाजपच्या हातून सुटली. त्यानंतर मतदार भाजपच्या विरोधात असल्याचं दिसून आलं. मात्र अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने मोठी खेळी करत बॅंकेची सत्ता खेचून आणली आहे.
हेही वाचा..“जनतेच्या मतांचा बुलडोजर या हुकूमशाही विरोधात आता फिरवावाचं लागेल”, ठाकरेंचा हल्लाबोल
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत असूनही राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा उठवत भाजपने खेळी खेळली आणि अवघ्या एका मताने बँकेची सत्ता खेचून आणली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाली.
हेही वाचा..“संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की, आणखी कुठली नशा करतात”?
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिलेले राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. राज्यात आर्थिक आणि राजकीय दृष्ट्याही प्रतिष्ठेची बँक असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे उदय शेळके यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवडणूक झाली. बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप सहा, काँग्रेस चार तर शिवसेना पुरस्कृत १ असे संचालक आहेत. (राष्ट्रवादीची एक जागा शेळके यांच्या निधनाने रिक्त) होती.
Read also
- हेही वाचा..“त्यांच्या घरी चाळीस- पन्नास नाही, तर हजारो खोके जातात,” संजय गायकवाड यांचा आरोप
- हेही वाचा..“माझ्या मुलांची नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी अजूनही माझा संघर्ष,” यशोमती ठाकूर यांच्या भावना अनावर
- हेही वाचा…हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले की, “मी कोणतंही…:”
- हेही वाचा…“आघाडीने भाजपविरोधात रणशिंग फुंकले, रणनीती ठरली, प्रत्येक जिल्ह्यात सभा”
- हेही वाचा..बच्चू कडूंना मोठा दिलासा..! 2 वर्षाची शिक्षा, त्यानंतर लगेचच जामीन मंजूर